Raigad news : रायगड जिल्ह्यात महाड येथे घरगुती गॅसचा पाईप लीक झाल्याने मोठी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एकाच घरातील तीन भावंडे गंभीरित्या भाजली गेली आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली. याठिकाणी स्वयंपाक करायसाठी गॅस पेटवला आणि पाईप लिक झाल्याने भडका उडून मोठी दुर्घटना घडली.
या घटनेत तीन भावंड भाजली गेली आहे. त्याच्यावर सध्या मुंबईत रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे गॅस जवळ काम करताना नेहमीच काळजी घ्यावी. तसेच गॅस शेगडी कनेक्शनची नियमित तपासणी करणेही अत्यावश्यक असते. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा झाल्यास जीवावर बेतू शकते.
याबाबत माहिती अशी की, महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत तीन भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाले. घरात गॅसजवळ काम करत असताना मोठ्या बहिणीच्या कपड्यांना आग लागली.
यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. ती भाजू लागली, यावेळी तिचा भाऊ आणि लहान बहीण तिला वाचवण्यासाठी गेले असतान ते दोघेही गंभीर जखमी झाले. यामुळे त्यांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रज्ञा प्रकाश आमले हिने स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवला असता गॅस सिलिंडरचा पाईप लिक होऊन पाईपने पेट घेतला. काही समजायच्या आतच सगळं काही घडलं. क्षणात आगीचा भडका उडाला. यामुळे पळापळ झाली. यामध्ये प्रज्ञाच्या कपड्यांनी पेट घेतला.
ती भाजू लागल्याने आरडाओरड करु लागली. तिचा भाऊ रुपेश प्रकाश आमले हा धावत गेला. बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याच्या कपड्यांनाही आग लागली. नंतर दोन्ही भावंडांना पेटताना पाहून लहान बहीण प्रिती प्रकाश आमले ही त्यांना वाचवायला गेली. मात्र तिघेही जखमी झाले आहेत.