पुराच्या पाण्यात स्वत:च मारली उडी; कारण ऐकून वाचवणाऱ्या लोकांनी मारला डोक्यावर हात

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पुर आले आहे. नद्यांचे पाणी वाढून ते गावात येताना दिसत आहे. त्यामुळे काही लोकं तर या पाण्यात वाहून जात आहे. अनेकांचा तर मृत्यू सुद्धा होत आहे. असे असतानाचा आता जळगावमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील एका परिसरात एक तरुण वाहून जात होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला सुखरुप बाहेर काढले आहे. गणेश पुंडलिक असे त्याचे नाव असून त्याने स्वत:नेच पाण्यात उडी मारल्याचे समोर आले आहे.

नागरिकांनी त्याला विचारपूस केली असता त्याने आपणच वाहत्या पाण्यात उडी घेतल्याचे सांगितले. घराकडे जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग म्हणून त्याने पाण्यात उडी घेतली होती, असे त्याने सांगितले आहे. त्यामुळे तिथे असणाऱ्या सर्वांनाच डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती.

रावेर तालुक्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे नद्याही ओसंडून वाहत आहे. अशात वाघोड गावच्या पुलाखालून वाहणाऱ्या पाण्यात एक तरुण वाहून गेला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. पण मोरगाव जवळ त्याला सुखरुपपणे पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

मोरगावच्या लोकांनी त्याची विचारपूस केली असता त्याने आपण मूळ मांगी येथील असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आणखी विचारपूस केली असता आपण स्वत:च या पाण्यात उडी मारली असल्याचे त्याने सांगितले आहे.

मला घरी लवकर जायचे होते त्यामुळे मी पाण्यात उडी घेतली होती. पाण्यातून शॉर्टकटने गेलो असतो म्हणून मी उडी घेतली, असे त्या तरुणाने सांगितले. तरुणाच्या या उत्तरावर अनेकांनी आपल्या डोक्यावर हात मारुन घेतला. पाण्याचा प्रवाह जास्त नसल्यामुळे गावातील लोकांनाही तरुणाला वाचवता आले आहे.