सध्या अनेकांना लांबचे किंवा जवळचे दिसायचे कमी आले आहे. अगदी लहान मुलांचेही डोळे अकाली कमकुवत होत आहेत. त्यांना जड चष्मा लावावा लागतो. याचा त्यांच्या अभ्यासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. असे असताना आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही फक्त 10 मिनिटात तुमचा चष्मा घालवू शकता.
यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. हे नवीन तंत्रज्ञान काय आहे, ते जाणून घेऊया. याबाबत माहिती अशी की, यूएसएच्या जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजनने हे अत्याधुनिक चष्मा काढून टाकणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे तुम्हाला दिलासा मिळणार आहे.
ज्याचा वापर आता भारतातील अनेक रुग्णालयांमध्ये चष्मा काढण्यासाठी केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे, -8.00 ते -3.00 पर्यंतच्या दृष्टी असलेल्या व्यक्तीवर सहज उपचार केले जाऊ शकतात.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक सहज आणि सोयीस्करपणे त्यांचा चष्मा घालवू शकतात. हे करून घेतलेल्या रुग्णाची कायमस्वरूपी सुधारणा होते, म्हणजेच एकदा करून घेतल्यावर पुन्हा चश्मा घालवा लागत नाही. अगदी 10 मिनिटात हे काम होईल.
यासाठी कोणतीही सुई नाही, टाके नाही, वेदना नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनची गरज नाही. व्यस्त जीवनशैली असलेल्या लोकांसाठी ते सोयीस्कर आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे. यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
तसेच तुमचा नंबर 6 महिन्यांसाठी सारखाच असावा. तो कमी जास्त झालेला नसावा. तसेच मोतीबिंदू, काचबिंदू यांसारखी दुसरी कोणतीही समस्या असू नये.
तसेच महिला असेल तर गर्भवती किंवा स्तनपान करणारी नसावी. नाहीतर ही शस्त्रक्रिया होत नाही. तसेच तुमचे स्टिरॉइड औषध चालू नसले पाहिजे. इत्यादी गोष्टींची आवश्यकता पाहिजे. यानंतर तुम्हाला ती करता येईल.