Beed News : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवनयात्रा संपवली.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या लग्नाला 6 महिने झाले, पती- पत्नीमध्ये वाद सुरू झाला.
पत्नी रुपालीने पती नितीकडे वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता. तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार त्रास द्यायची. यामुळे तो कंटाळला होता. यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.
तसेच बाळंतपणासाठी रुपाली माहेरी बाभळगाव येथे आली होती. त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन सासरवाडीला आला होता. यावेळी त्याचा वाद झाला. हा वाद वाढतच गेला. यातून त्याने हे कृत्य केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. नितीन विनायक शेळके असे त्याचे नाव आहे. तो केवळ 32 वर्षांचा होता.