Pune Accident News : पुण्यातील भोर तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्यासह एकजण जखमी आहे. देवडी येथे हा भीषण अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही कार किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे निघाली होती. ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे जात असताना ही घटना घडली आहे.
चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने थेट कारला धडक दिली, अशी माहिती समोर येत आहे. या धडकेनंतर कारच्या चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच महिलेच्या दोन वर्षाच्या बाळासह अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गणेश शिवाजी लेकावळे (वय २८ वर्ष) आणि तृप्ती अक्षय जगताप (वय २६ वर्ष) अशी या अपघातात मृत्यू झालेल्याची नावे आहेत. मयत तृप्ती यांचा दोन वर्षाचा मुलगा कृष्णा अक्षय जगताप याच्यासह प्रकाश बाबुराव दरेकर हे जखमी आहेत.
दरम्यान, ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या अपघात प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलीस याबाबत तपास करत आहेत. ही धडक एवढी भीषण होती की, कार थेट ट्रकच्या खाली घुसली. यामुळे जागीच दोघांचे निधन झाले. या घटनेमुळे अपघात मृत झालेल्या कुटूंबाला एकच धक्का बसला होता.