पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.
या आपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून इतर शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बावडा (ता.इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल (ता. १९) रोजी रात्री गणपतीपुळे येथे गेली होती.
आज सहल पहाटे परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीलगत सहलीची एसटी बस आणि टेम्पोची धडक झाली. यावेळी बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते. यामध्ये बसचा भुगा झाला आहे.
एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य शिक्षक व विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. अचानक झालेल्या या अपघातात पुढे बसलेले शिक्षक काळे जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पावले. यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. या अपघातात दुसरा एक शिक्षक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
इतर विद्यार्थ्यांना सुखरूप आपापल्या घरी पोचविण्यात आले आहे. जखमी झालेल्या शिक्षकाला विद्यार्थ्याला अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.