Gold Income Tax Rules: विवाहीत स्त्रीला घरात ‘इतकेच’ सोने ठेवण्याची परवानगी, अन्यथा इन्कम टॅक्सची कारवाई होणार, वाचा नवा नियम…

Gold Income Tax Rules: अंगावर सोनं बाळगणे ही अनेकांची हौस असते. लग्नात तर सगळेच सोन्याने सजलेले असतात. आता मात्र लग्नाच्या वेळी वधूला सोन्याचे दागिने लादणं कधीकधी महागात ठरू शकते. आयकर कायद्यानुसार एक विवाहित महिला किती सोने ठेवू शकते? याबाबत माहिती समोर आली आहे.

आपल्या देशात सोन्याची खरेदी आणि साठवण्याबाबत सरकारने काही नियम केले आहेत. यामुळे याबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. सोन्याबद्दल महिलांना जास्तीचे आकर्षण असते. अशा परिस्थितीत सरकारने यासाठी अनेक नियम केले आहेत.

सरकारने तुमच्या घरात किती सोने असावे याबाबतही मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये एक विवाहित महिला जास्तीत जास्त ५०० ग्रॅम सोने घरात ठेवू शकते. तर अविवाहित महिलांसाठी २५० ग्रॅमपर्यंत मर्यादा राहते. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

याशिवाय पुरुष, विवाहित किंवा अविवाहित, जास्तीत जास्त १०० ग्रॅम सोने ठेवू शकतो. या मर्यादेपर्यंत सोने ठेवल्यास तुम्हाला त्यासाठी कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. तसेच तुम्हाला कोणी काहीही कागदपत्रे मागणार नाही.

असे असताना आता तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्यास तुम्ही दरवर्षी आयकर रिटर्नमध्ये याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. तुम्ही आयकर विभागाला याबाबत माहिती दिली नसेल आणि तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सोने असल्याचे आढळले तर आयकर छाप्यांमध्ये जप्त केले जाईल. यामुळे अडचण निर्माण होईल.

तसेच तुमच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाईल. तुमच्याकडे असलेले सोन्याचे दागिने कायदेशीर मार्गाने घेतल्याचे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. यामुळे तुमच्यापुढे अनेक अडचणी निर्माण होतील. यावेळी तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.