Satara News : सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे शेताच्या बांधावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे याने त्याचा चुलत भाऊ मोहन सुरेश धायगुडे याचा डोक्यात दगड घालून खून केला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना अहिरे (ता. खंडाळा) येथे घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शेताच्या बांधावरून झालेल्या वादातून आपल्याच चुलत भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
धरून ज्ञानेश्वर उर्फ नोन्या विलास धायगुडे असे आरोपीचे नाव आहे. तर मोहन सुरेश धायगुडे असे हत्या झालेल्या चुलत भावाचे नाव आहे. अहिरे येथील शेरी नावाच्या शिवारात मोहन धायगुडे आणि संशयित ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे यांची शेती आहे.
या दोघांमध्ये शेताच्या बांधावरून नेहमी वाद होत होते. शनिवार ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे याने शेतीचा बांधा कोरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, मोहन धायगुडे यांच्याशी त्याचा वाद झाला होता. यावेळी संशयित आरोपी सोन्या याने मोहन यास शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नसतो, अशी धमकी दिली.
दरम्यान, या घरगुती वादाच्या घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात केली नव्हती. नंतर दुपारी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या धायगुडे आणि मोहन यांची गावाच्या पारावर भांडण झाली.
यामध्ये ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याने मोहन याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर ज्ञानेश्वर उर्फ नोन्याने धायगुडे याने मोहन यास ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी खंडाळ्याकडे गेला. याबाबत त्याने कोणाला माहिती होऊ दिली नाही.
दरम्यान, नंतर या घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच त्यांनी ज्ञानेश्वर उर्फ नोन्या याला रस्त्यामध्ये ताब्यात घेतले. या घटनेची फिर्याद वैशाली मोहन धायगुडे यांनी दिली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.