शारीरिक संबंधांवेळी कुत्र्याचे भयंकर कृत्य, थेट मालकावरच…; घटनेने उडाली खळबळ, प्रकरण कोर्टात

कुत्र्याचा मालकावर प्राणघातक हल्ला अशा बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील पण शारीरिक संबंधांवेळी एक्सएल बुली कुत्र्याने मालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्रणयक्रिडा सुरू असताना अमेरिकन एक्सएल बुली जातीच्या कुत्र्याने चक्क मालकावरच हल्ला केला आणि हे प्रकरण थेट कोर्टात गेले.

यामुळे याची चर्चा रंगली आहे. हँक नावाच्या या दोन वर्षांच्या कुत्र्याला 2 ऑगस्ट रोजी स्कॉट थर्स्टन (वय वर्षे 32) यांच्या ग्लॅनमन, कारमार्थेनशायर इथल्या घरी ठेवण्यात आले होते. या सुनावणीत असे सांगण्यात आले की, थर्स्टन यांची जोडीदार लीन बेल यांनी पहाटे पोलिसांना फोन करून जोन्स टेरेस येथे बोलवून घेतले.

मिस्टर थर्स्टन बागेत कुत्र्यावर ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. मिस बेल आणि मिस्टर थर्स्टन प्रणयापूर्वी एकमेकांशी भांडत होते. जेव्हा त्यांनी सेक्स करायला सुरूवात केली तेव्हा कुत्र्याने मिस्टर थर्स्टन यांच्यावर हल्ला केला. यामुळे मोठी पळापळ झाली.

कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताचा आणि हनुवटीचा चावा घेतला होता, नंतर कुत्र्याला घराच्या खालच्या मजल्यावरील खोलीत ठेवण्यात आले. पोलिसांनी कुत्र्याला ताब्यात घेतले आणि त्याला डायफेड पॉविस पोलिस मुख्यालयात ठेवण्यात आले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, भविष्यात हा कुत्रा त्यांना गंभीररित्या जखमी करू शकतो किंवा लहान मुलांपैकी कोणाला तरी तो दुखापत करू शकतो. लहान मुलांचा विचार करता कुत्र्यापासूनच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन दंडाधिकार्‍यांनी कुत्र्याला ठार करण्याचे आदेश दिले.

तसेच कोर्टाने 800 पौंडांचा दंडदेखील ठोठावला. यामुळे सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी अशा घटना उघडकीस येत असतात. अनेकांवर यामुळे हल्ले होतात.