Hardik Pandya : आयपीएलमध्ये नुकत्याच खेळाडूंचे लिलाव पार पडले. यामध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रेड करत सर्वांनाच धक्का दिला होता. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबत आता अनेक खुलासे समोर येत आहेत.
हार्दिक पांड्या दोन वर्षांपासून गुजरात संघाची धुरा संभाळत होता. पण आता 2024 आयपीएल हंगामाआधी तो मुंबईचा झाला आहे. पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईने हार्दिक पांड्याला 15 कोटी रुपयांच्या करार करत ताफ्यात घेतले.
असे असताना या व्यतिरिक्त ट्रान्सफर फी देखील दिली आहे. ज्याविषयी फक्त आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिल समितीला माहिती होते. यामध्ये मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे याचीच चर्चा रंगू लागली आहे.
हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने लिलावाआधी ट्रेड केले. पण पांड्याच्या पगारापेक्षा अधिक रक्कम गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी म्हणून मिळाली आहे. मुंबईने तब्बल 100 कोटी रुपये ट्रान्सफर फी मोजून हार्दिकला आपल्या ताफ्यात दाखल केले आहे.
दरम्यान, अहमदाबाद फ्रँचायझी MI पेक्षा खूप वेगळी आहे. दोघांची संस्कृती आणि ध्येये वेगळी आहेत. MI ही एक व्यावसायिक कुटुंबाद्वारे चालवली जाणारी फ्रँचायझी आहे. या रकमेबद्दल अटकळ लगावल्या जातायेत.
असे असताना मात्र हा आकडा 100 कोटी असल्याची चर्चा आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता चर्चेला देखील उधाण आलं आहे. आता याबाबत अजून काही माहिती समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.