कोल्हापूरात तळ्याकाठी खेळत होती लहान मुलं, अचानक दिसलं असं काही की सगळेच हादरले

कोल्हापूरातून अशी एक बातमी समोर आली, ज्यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूराच्या करवीर तालुक्याील गड मुडशिंगीमध्ये एका तळ्याच्या काठावर सोन्याची बिस्कीटे सापडली आहे.

विशेष म्हणजे २४ लाखांचे सोने याठिकाणी सापडले आहे. तळ्याच्या काठावर सोने सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हे सोनं ताब्यात घेतलं आहे.

गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. इतके लाखांचे सोने सापडलेले असून अजून कोणीही त्यावर मालकी हक्का दाखवलेला नाही. त्यामुळे सोन्याचा खरा मालक कोण असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

तळ्याच्या काठ्यावर एक पिशवी सापडली होती. त्यामध्ये ३२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किटे आहेत. तसेच १० ग्रॅम वजनाची ४ सोन्याची बिस्किटे, १० ग्रॅम वजनाची २ नाणी आणि ५ ग्रॅम वजनाचे एक नाणे असे सर्व मिळून ३९४ ग्रॅमचे सोने इथे सापडले आहे.

सोन्याची बिस्किटे सापडल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. आता पोलिसांनी हे सोने नक्की कोणाचे आहे हे शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात सोने असल्यामुळे ते खरे आहे की नाही? असाही प्रश्न पडला होता. त्यावर सोन्याची तपासणी केली असता ते खरे असल्याचे समोर आले आहे.

१६ जुलैला काही लहान मुलं तळ्याकाठी खेळत होती. त्यावेळी त्यांना ही सोन्याची पिशवी सापडली. त्यानंतर त्यांनी ती पिशवी गावातील विश्वास गडकरी यांच्याकडे दिली. त्याचवेळी पोलिसांनाही याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विश्वास गडकरी यांचे घर गाठले आणि ते सोने ताब्यात घेतले आहे.