Bank news : भारतात सर्व बँकांमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या रिझर्व्ह बँक (RBI) आणि इतर दोन बड्या बँकांना धमकीचे ई मेल आले. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामुळे अनेकांना धक्का बसला.
लाखोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांचे Sallary Account असणाऱ्या या बँकांना आलेल्या धमकीनंतर अनेकांच्याच मोठे टेन्शन आले. HDFC आणि ICICI या दोन बँकांचा समावेश यामध्ये आहे. मेलमध्ये आरबीआय आणि या दोन्ही खासगी बँकांवर देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा करण्याचा मोठा आरोप केला आहे.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच या मेलमध्ये मुंबईत बॉम्ब ठेवल्याचीही धमकी देण्यात आली. या मेलमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह आरबीआयच्या गव्हर्नरपदी असणाऱ्या शक्तिकांता दास यांच्या निलंबनाचीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, फोर्ट येथे असणारी आरबीआयची नवी मध्यवर्ती इमारत, चर्चगेटजवळील एचडीएफसी हाऊस, वांद्रे कुर्ला संकुल येथील आयसीआयसीआय बँक टॉवर्स या ठिकाणांचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला होता. मेल आल्यानंतर पोलिसांनी लगेच यंत्रणा सावध केली.
संबंधित 11 ठिकाणांवर झाडाझडतीसुद्धा घेण्यात आली. पण, कोणतीही संशयास्पद गोष्ट यावेळी तपासात समोर आली नाही. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला शासनाने कडक शासन करावे, असे त्या धमकीवजा ईमेलमध्ये म्हटले आहे. देशाच्या अर्थमंत्री यांनी तातडीने त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि एका जाहीर पत्रकाच्या माध्यमातून या घोटाळ्याला वाचा फोडावी.