IIT BHU GangRape: 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री वाराणसीच्या आयआयटी बीएचयू कॅम्पसमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. वर्षअखेरीस त्या पीडितेच्या तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. गँगरेपच्या 60 दिवसांनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान यांना पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी बुलेट मोटरसायकल देखील जप्त केली आहे. ज्यावर तीन आरोपी घटनेनंतर बीएचयूमध्ये पोहोचले होते.
1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पीडित विद्यार्थीनी आयआयटी बीएचयूच्या न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून रात्री दिडच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर आली होती. त्यावेळी ती वाटेत एका मित्राला भेटली आणि त्या दोघांच्या गप्पा रंगल्या. ते बोलत बोलत हॉस्टेलच्या परिसरात फिरत होते. त्याचवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले.
तक्रारीत म्हटलं आहे की, या नराधमांनी पीडित विद्यार्थीनीला तिच्या मित्रापासून लांब नेलं आणि धमकावलं. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून तिला विवस्त्र केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याशिवाय तिघांनी मुलीचा नंबरही घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या गँगरेपचे तिन्ही आरोपी खरे वाराणसीचे रहिवासी आहेत. तिन्ही आरोपी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे भारतीय जनता पक्षाने या तीन आरोपींची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तिन्ही आरोपी पकडल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच विद्यार्थीनीवरील लैंगिक अत्याचारांप्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.