Nashik Crime News : थर्टी फस्टच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर भयानक थरार; प्रवासी जीव मुठीत घेवून पळाले

Nashik Crime News :  नवीन वर्षाच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरकाप उडवणारी घटना घडली. मुंडेगाव शिवरात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांवर कोयता आणि चोपरने हल्ला केला. जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज दरोडखोरांनी लुटल आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना थर्टी फस्टच्या मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली. दिवा येथील पाच प्रवासी एका खाजगी वाहनातून त्र्यंबकेश्वरला जात होते. मुंडेगाव शिवरात असताना त्यांच्या वाहनावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयता आणि चोपरने प्रवाशांचा जीव धमकावत त्यांना पैसे आणि दागिने लुटले. प्रवाशांचे दीड लाख रुपये, मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने हल्लेखोरांनी लंपास केले.

हल्ला झाल्याची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील नगर – दौंड रोडवर घारगाव परीसरात महींद्रा झायलो आणि ट्रक यांच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर,7 जण गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण येथील रहिवासी असलेले शेख कुटुंबीय बेलवंडी फाटा मार्गे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोळगाव येथील कोळगाववाले बाबांच्या दर्यामध्ये दर्शनासाठी महिंद्रा झायलो या कारमधून येत होते.

घारगाव परिसरात नगर दौंड महामार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर, ओव्हरटेक करण्याच्या नादात, समोरुन भरधाव वेगाने नगर कडून दौडकडे सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पोशी कारची घारगांव परीसरात समोरासमोर जोराची धडक झाली.

या अपघातात शेहबाज अजीज शेख वय 30, मोहम्मदगाजी रोप बांगी (वय 13), लुसेन शौयाब शेख (वय 23) हे तिघे जण जागीच ठार झाले. तर या अपघातात 7 जण जखमी झालेले आहेत. जखमींवर अहमदनगर येथील पॅसिफिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाणे घटनास्थळी दाखल झाले.पोलिस पुढील तपास करत आहेत.