साहेब, रेड मारा माल सापडेल, खबऱ्याचा DYSP ना फोन, पोलिसांना छापा टाकताच…; साईबाबांच्या पावननगरीत भयंकर प्रकार उघडकीस

साईबाबांची नगरी असलेल्या शिर्डीत अवैध गोष्टींचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पण त्या गोष्टींवर आळा घालण्यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात धाड टाकत कारवाई करताना दिसत आहे. शुक्रवारीही पोलिसांनी एक छापा टाकला आहे.

शुक्रवारी रात्री शिर्डी पोलिसांनी छापा टाकला होता, त्यामध्ये त्या्ंनी २१ किलो गांजा जप्त केला आहे. त्याची बाजारात किंमत तीन लाख रुपये आहे. शिर्डी पोलिसांच्या या कारवाईमुळे इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्येही धडकी भरली आहे.

शिर्डीचे पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांना गांजा व्यवसायाबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. शिर्डीच्या हेलिपॅड रोडवर अवैध गांजा विक्री सुरु असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. तसेच तिथे गांजाचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

त्यानंतर संदीप मिटके यांनी पोलिस पथकासोबत त्याठिकाणी छापा टाकला होता. त्यावेळी दोन लाख ९० हजार रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. २० किलो ८०० ग्रॅम इतके या गांजाचे वजन होती. तसेच तिथे वजन काटासह पिशव्याही सापडल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी तिथे असणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी चांगदेव कोते यांना अटक केली आहे. पण त्यातील तीन आरोपी हे फरार झाले आहे दत्तात्रय बाबुराव करपे, अनिता दत्तात्रय करपे, शुभम दत्तात्रय करपे असे त्या आरोपींचे नाव आहे.

शिर्डीमध्ये आजही अवैध व्यवसाय सुरु आहे. शिर्डीत मोठ्या प्रमाणात दारु विक्री, गांजा विक्री, गुटखा विक्री, जुगार या सगळ्या गोष्टी सुरु आहे. याचा तरुण पिढीवरही वाईट परीणाम होत आहे. त्यामुळे शिर्डीचे पोलिस अशा व्यवसायांवर कारवाई करत ते कायमस्वरुपीपणे बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.