Rare Bird: पृथ्वीतलावरील लाखो जीवांमध्ये नर आणि मादा असे दोन प्रकार असतात. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. हा पक्षी अत्यंत दुर्मिळ आहे आणि मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.
या पक्षाचे नाव “गाएंड्रोमॉरफ” आहे. या पक्षाच्या एका बाजूला नराप्रमाणे काळे आणि मोठे पंख आहेत. तर दुसऱ्या बाजूला मादीप्रमाणे ब्राउन आणि पिवळ्या रंगाचे पंख आहेत. या पक्षाच्या छातीवर कोणताच स्पॉट नाही, हे मादी असल्याचे लक्षण आहे. विशेष म्हणजे या पक्षामध्ये मादीप्रमाणे अंडाशय देखील आहे.
अशा प्रकारचे पक्षी हे अत्यंत दुर्मिळ बाब आहे. जेव्हा नर पक्षाचे दोन स्पर्म मादीच्या अशा अंडाशयात जातात. तेव्हा त्यात दोन न्यूक्लियस तयार होतात. तेव्हा अशा पक्षाचा जन्म होतो. नर पक्षाचे दोन स्पर्म एकत्र आल्यावर भ्रूणात नर आणि मादी, दोघांचे क्रोमोजोम येतात.
ही अत्यंत दुर्मीळ प्रजनन प्रक्रिया आहे. 64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पाउडरमिल एविएशन रिसर्च सेंटरमध्ये अशाच प्रकारचा पक्षी सापडला होता. हा पक्षी पिलांना जन्म देतो. या पक्षामध्ये मादीप्रमाणे अंडाशय आहे.
यामुळे हा पक्षी अंडी घालून पिलांना देखील जन्म देऊ शकतो. हा प्राणी अत्यंत दुर्मिळ आहे. कारण क्वचितच प्राणी किंवा पक्षांमध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्य अढळतात. पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या रेड नेक फॅलेरॉप हा दुर्मिळ पक्षी दिसला आहे. या पक्षाचं मूळ उत्तर अमेरिकेत आढळतं.
विणीच्या हंगामात हे परदेशी पाहुणे पालघरच्या समुद्र किनाऱ्यांवर येतात. ऐरवी काळया आणि पांढर्या रंगाचा असलेला हा पक्षी विणीच्या हंगामात मात्र या पक्षाच्या गळ्याजवळील पिसांना लालसर रंग येतो. यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये रेड फॅलरोपचे दर्शन झाले होते.