Online Gang Raped : गेम खेळत असलेल्या एका 16 वर्षीय तरुणाच्या व्हर्चुअल अवतारावर ऑनलाइन गँगरेप करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली आहे. ही एक सायबर गुन्हेगारीमधील फारच विचित्र प्रकार आहे. सध्या जगभरामध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर या मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही मुलगी व्हीआर वापरुन मेटा या फेसबुकच्या मालकीच्या मेटाव्हर्स या माध्यमावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला.
ही मुलगी हेडसेट घालून ऑनलाइन गेम खेळत होती. त्याचवेळी व्हर्चुअल अवतारातील काही तरुणांनी तिच्या या व्हर्चुअल अवताराला घेरले. ही मुलं या मुलीच्या व्हर्चुअल अवताराशी छेडछाड करु लागले, नंतर त्यांनी तिचा ‘गँगरेप’ केला. पीडित मुलीला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही.
असे असले तरी या मुलीच्या मानसिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. घटनेनंतर तिचे समोपदेशन केले जात आहे. या घटनेत खऱ्या आयुष्यात बलात्कार पीडितेला जो मानसिक त्रास होतो तसाच त्रास या मुलीला झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याबाबत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. असे असताना खऱ्या जगात आधीपासूनच पोलिसांकडे बलात्काराची एवढी प्रकरणं असताना या गोष्टींना प्राधान्य द्यावं की व्हर्चुअल जागातील गुन्ह्यांना द्यावे, हा देखील मोठा प्रश्न पोलिसांपुढे आहे.
दरम्यान, ही तरुणी होरायझन वर्ल्ड्स नावाचा गेम खेळत होती. या प्लॅटफॉर्मवर व्हर्चुअल लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र युनायटेड किंग्डममध्ये या असल्या प्रकरणांमध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.