The Burning Plane : जपानमध्ये विमानाला लागली आग, 379 प्रवाशांनी चक्क जळत्या विमानातून मारल्या उड्या, पाहा Video

The Burning Plane : जपानमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2 जानेवारी रोजी जपानची राजधानी टोकियो येथील हानेडा विमानतळावरील धावपट्टीवर विमानाला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यूव झाला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल जात आहे.

झालं असं की, जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. तेव्हा त्या विमानात ३६७ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. जपानी न्यूज एजन्सी क्योडोच्या वृत्तानुसार, हे विमान विमानतळावर उपस्थित असलेल्या दुसऱ्या विमानाला धडकले होते. तर दुसरे विमान जपान तटरक्षक दलाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

टक्करवेळी तटरक्षक दलाच्या विमानात सहा क्रू मेंबर्सही उपस्थित होते. जपान एअरलाइन्सच्या विमानातील सर्व ३७९ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तटरक्षक दलाच्या विमानातील 5 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.

समोर आलेल्या या अपघाताच्या व्हिडिओमध्ये जपान एअरलाइन्सचे विमान घसरताना दिसत आहे. यानंतर विमानाला आग लागली. विमान धावपट्टीवर पळत असताना त्यातून जाळ चाललेला दिसत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तिथे हजर झाले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

तटरक्षक दलाने सांगितले की, त्यांच्या विमानात 6 क्रू मेंबर्स होते. यापैकी एक जण जखमी अवस्थेत विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, उर्वरित ५ क्रू मेंबर्स लगेच बाहेर पडू शकले नाहीत. वृत्तानुसार, अपघातात पाचही क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.

तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे विमान भूकंपग्रस्त भागांसाठी मदत साहित्य घेऊन जात होते. जपानच्या भूमी, पायाभूत सुविधा, वाहतूक आणि पर्यटन मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. हनेडा विमानतळाच्या सर्व धावपट्ट्या सध्या बंद आहेत.