रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली आहे. यामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तसेच १२० लोक अजूनही ढिगाऱ्याखाडी अडकून बसलेली आहे. बचावकार्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ते लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढत आहे. अशात आणखी एक धक्कादायक घटना घडली तिथे घडली आहे.
बचावकार्य करत असताना अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील अग्निशमन पथकातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा तिथे मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
घटना घडल्यानंतर तातडीने बचावपथक हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामध्ये शिवराम ढुमणेही बचावकार्यासाठी आले होते. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले जात होते..
रुग्णालयातकडे जात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी ते रात्री २.३० वाजता इर्शाळवाडीत दाखल झाले होते.
दरम्यान, पाऊस आणि अंधार असल्यामुळे अनेक अडथळे बचावकार्य करताना येत होते. त्यामुळे काही काळासाठी बचावकार्य थांबवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे बचावकार्य सुरु करण्यात आलेले असून २७ लोकांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.