Rain Alert : राज्यात धो- धो पाऊस बरसणार, हवामान खात्याने दिला इशारा, ‘या’ राज्यांना झोडपणार…

Rain Alert : पुढील दोन ते तीन महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. काल रात्री महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहे.

यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज राजधानी दिल्लीसह एनसीआरमध्ये आणि काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस (Rain Alert) पडू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.

तसेच काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, पुडुचेरी आणि कराईकल या दक्षिणेकडील राज्यांच्या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. तर काही जिल्ह्यात दाट धुक्याचा प्रभाव दिसत आहे. यामुळे हवामानात अनेक बदल दिसून येत आहेत. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल, असंही हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे फळबागा असलेले शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात सर्वत्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाले आणि तलावांच्या काठावर जाणे टाळावे.अतिमुसळधार पावसामुळे रब्बी हंगामाची चिंता वाढली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, मका या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. फळबागांवरही अवकाळी पावसाचा परिणाम होऊ शकतो.