क्रिकेटविश्व हादरलं! दिल्लीच्या दिग्गज क्रिकेटपटूला बलात्कार प्रकरणी 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू संदीप लामिछाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप लामिछानेला काठमांडू कोर्टाने 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि देशाच्या स्टार क्रिकेटपटूंपैकी एक संदीप लामिछाने याला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संदीप लामिछाने याला यापूर्वीच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. काठमांडू न्यायालयाने बुधवारी या प्रकरणावर सुनावणी करताना फिरकीपटूला 8 वर्षांची शिक्षा सुनावली.

आयपीएल व्यतिरिक्त संदीप लामिछाने जगातील इतर अनेक लीगमध्ये खेळला आहे. गेल्या वर्षीच न्यायालयाने संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. या क्रिकेटपटूला दंडही ठोठावण्यात आला आहे. पीडितेला भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

संदीप लामिछाने यांच्यावर ऑगस्ट २०२२ मध्ये काठमांडू येथील एका हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर तो जामिनावर बाहेर आला. जामीन मिळाल्यानंतर संदीप लामिछानेही संघात सामील झाला. त्या काळात त्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले.

संदीपने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग-२ साठी यूएई दौऱ्यावर जाण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य केली. जानेवारी 2023 मध्ये त्यांची जामिनावर सुटका झाली.

23 वर्षीय संदीप लामिछानेने दोन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या लेग स्पिनने नेपाळला अनेक सामने जिंकून दिले आहेत. आयपीएलमध्ये खेळणारा तो नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे.

त्याने 2018 आणि 2020 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची जर्सी घातली होती. संदीपने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 51 एकदिवसीय आणि 52 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 112 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 विकेट्स घेतल्या. त्याच्या एकूण T20 कारकिर्दीत त्याने 144 सामन्यात 206 विकेट घेतल्या आहेत.