Gold-Silver Price: जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे.
देशभरात किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोने-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. तुम्ही सोने-चांदी खरेदी करणार असाल, तर आज सोन्या-चांदीची विक्री कोणत्या दराने होत आहे हे माहिती असण तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
सोने आणि चांदीचे दर किती?
राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव 50 रुपयांनी घसरून 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. काल सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. चांदीचा भावही 450 रुपयांनी घसरून 76,300 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, “बुधवारी सोन्याचा व्यवहार थोडा कमी झाला. दिल्लीच्या बाजारात सोन्याची (24 कॅरेट) स्पॉट किंमत 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होती, जी मागील बंदच्या तुलनेत 50 रुपये कमी आहे.
दरम्यान, MCX वर फ्युचर्स ट्रेडमध्ये फेब्रुवारी करारासाठी सोन्याचा भाव 86 रुपयांनी वाढून 62,265 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय मार्च करारातील चांदीचा भाव 243 रुपयांनी वाढून 72,290 रुपये प्रति किलोवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.