Ram Mandir : उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपूर्ण मंदिरात रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरुद्ध आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती. असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच अपूर्ण मंदिरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे अशुभ कल्पना आहे. अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही पीठांचे शंकराचार्य अनुपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तराखंडच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले, या कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने बहुतांश प्रमुख हिंदू धर्मगुरू अनुपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंदिराची उभारणी पूर्ण होण्याआधीच श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हिंदू धर्माच्या विरोधात आहे. यामुळे तसे करणे चुकीचे ठरेल.
घाई करण्याची आवश्यकता नव्हती, शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती म्हणाले आपण मोदीविरोधी नसल्याचे स्पष्ट करतानाच धर्मशास्त्राविरुद्ध जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. धर्मग्रंथानुसार प्राणप्रतिष्ठा झाली नाही, तर सैतानी शक्तींचा प्रवेश होतो आणि सर्वत्र गोंधळ माजतो, असे निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले.
दरम्यान, यावर राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामानंद संप्रदायाचे आहे. रामानंद पंथाने केवळ विष्णू अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले, असे ते म्हणाले.
दरम्यान, राम मंदिराच्या समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. अनेकांना याबाबत निमंत्रण दिले आहे. यामुळे अनेक बडे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. याची चोख व्यवस्था देखील ठेवण्यात आली आहे.