Sharad Mohol : …तर शरद मोहोळ वाचला असता! हादरवणारी माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येच्या घटनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. भरदिवसा पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा भागात जिथे शरद मोहोळ राहायचा त्या परिसरातच मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना पोळेकरने याआधीही एकावर गोळीबार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

त्यामुळे तो गोळीबार जर पोलिसांना वेळेत कळला असता तर आज शरद मोहोळ वाचला असता असेही सांगितले जात आहे. मुन्ना पोळेकर हा वयाने जरी २० वर्षांचा असला तरी त्यांच्या डोक्यातले गँगवॉर सुरुच होते.

शरद मोहोळनं नितीन कानगुडे याचा १० वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला त्यांनी आता घेतला. शरद मोहोळला संपवणाऱ्या मुन्ना पोळेकरने मोहोळच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वीच अजय सुतारवर गोळीबार केला होता.

असे असताना तो गुन्हा बाहेर आला नाही अन् पुढे शरद मोहोळची ५ जानेवारीला हत्या करण्यात आली. दरम्यान, मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना केलेल्या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे.

पोलिस आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशा आठ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या तपासात आढळून आले की, मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्यात आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारांवरून वाद होते. या वादात मुन्ना पोळेकरच्या मामाचे आर्थिक नुकसान झाले होते. म्हणूनच मुन्ना पोळेकरने शरद मोहोळची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र, मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना दुसऱ्या एका कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. पोलिसांना या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.