---Advertisement---

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणातला मास्टर माईंड कोण? कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती, थेट नावच आलं समोर…

---Advertisement---

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता ही हत्या झाल्यानंतर आरोपीने मास्टर माईंडला कॉल केला होता अशी माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.

आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन केंद्र सरकारच्या एका संस्थेतील कर्मचारी संतोष कुरपेला केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद मोहोळचा गेम केला असून ही गोष्ट मास्टर माईंडला सांगा, असे फोनवर सांगितले आहे.

अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी तीन जणांना अटक केली. त्यांना न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन वकील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. नितीन अनंता खैरे (वय – ३४, रा. गादी स्टेट, कोथरूड), आदित्य विजय गोळे (वय २४) आणि संतोष दामोदर कुरपे (रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. संतोष कुरपे हा या केंद्र सरकाराच्या संस्थेत ऑफिस असिस्टंट या पदावर आहेत.

मोहोळचा खून करण्यापूर्वी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हडशी गावात गोळीबाराचा सराव केला होता. खैरे आणि गोळे यांनी आरोपीला शस्त्र खरेदीसाठी मदत केली आहे. तसेच खुनाच्या कटात त्याचा सहभाग आहे. त्याने इतर आरोपींकडून तयारी करून घेतली.

शरद मोहोळचा खून होण्यापूर्वी आरोपींची एकत्र मिटिंग झाली होती त्याला आरोपी आदित्य गोळे उपस्थित होते. खून केल्यानंतर मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी हे कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे हे आरोपी थांबले होते.

त्याठिकाणी आरोपींना त्यांचे नातेवाईक भेटायला आले होते. येथे आरोपीला एक नवीन सिम कार्ड देण्यात आले. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला फोन संतोष कुरपेला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---