सध्याच्या काळात जर कोणी 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर प्रत्येकाच्या मनात एकच नाव येते आणि ते नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा. तो एक महान क्रिकेटपटू होता. अनेकांना त्याने घाम फोडला होता.
असे असताना आता जेव्हा जेव्हा 400 किंवा त्याहून अधिक धावा कोणी केल्या तर जेव्हा ब्रायन लारासोबत भारताच्या प्रखर चतुर्वेदीचेही नाव घेतले जाईल. कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध 404 धावांची अविश्वसनीय इनिंग खेळली.
प्रखरने 638 चेंडूंचा सामना करत 404 नाबाद धावांची अप्रतिम खेळी खेळली, ज्यामध्ये 46 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्यामुळे कर्नाटकने 8 बाद 890 धावा करून डाव घोषित केला. प्रखर चतुर्वेदी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि सध्याचे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड यांचे भागीदार आहेत.
दोघे कर्नाटकसाठी एकत्र क्रिकेट खेळतात. इतकेच नाही तर प्रखर आणि समित दोघेही कूचबिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकत्र खेळत होते. समित द्रविड फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात २२ धावा करून बाद झाला.
प्रखरची 404 धावांची धावसंख्या ही कूचबिहार ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रखरचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्याची आई डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ आहे.
दरम्यान, त्याच्या या खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. येणाऱ्या काळात देखील अशाच खेळीची अपेक्षा त्याच्याकडून आहे. कर्नाटकने त्याच्या खेळीमुळे मोठी मजल मारली आहे.