Ram mandir : राम मंदिरासाठी रियल हिरोंनी तुरुंगवास भोगला, त्यांनाच सोहळ्याचे निमंत्रण नाही, कारसेवक नाराज

Ram mandir : सध्या देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे राम मंदिर कार्यक्रमाची. अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत. असे असताना मात्र मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नाही.

यामुळे धुळ्यातील कारसेवकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे त्यांनी स्वखर्चाने अयोध्येत जाण्याची भावना व्यक्त केली आहे. धुळे शहरात विविध कार सेवकांच्या माध्यमातून 1990 मध्ये जनजागृती करण्यात येत होती. या लढ्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

यामध्ये चंद्रकांत शेळके यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पैसे जमवून राम मंदिराच्या उभारणीसाठी जनजागृती केली होती. चंद्रकांत शेळके यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात कारसेवक म्हणून काम केलं. जीवाला धोका असताना देखील चंद्रकांत शेळके यांनी कार सेवकाची जबाबदारी समर्थपणे पार पडली.

चंद्रकांत शेळके यांनी इतरांसमवेत कार सेवक म्हणून सहभाग घेतल्याने त्यांना तब्बल पंधरा दिवसांचा कारावास देखील भोगावा लागला. आज मात्र कार सेवकांना अद्याप निमंत्रण आलेले नाही.

ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान दिले त्यांचा यथोचित सन्मान व्हावा, एवढीच अपेक्षा धुळ्यातील कारसेवक चंद्रकांत शेळके यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे त्यांना यासाठी अजून तरी निमंत्रण मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सध्या देशात राम मंदिर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यामुळे याची चर्चा सगळीकडे आहे. अनेकांना निमंत्रण आले आहे तर काहींना निमंत्रण अजूनही आले नाही. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.