Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गुंडाने एका तरुणीची छेड काढल्याबद्दल त्याच्या भावाने दोन मित्रांसह त्याचा खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील लष्कर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज बबन शेख (वय 25, रा. भवानी पेठ) हा एका सराईत गुंड होता. त्याच्यावर लष्कर, समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल होते. तो नुकताच तुरुंगातून सुटून आला होता. शेखने 16 जानेवारी रोजी रात्री एका तरुणीची छेड काढली.
या घटनेची माहिती तरुणीच्या भावाला मिळाली. तो संतप्त झाला आणि त्याने दोन मित्रांसह शेखचा खून करण्याचा कट रचला. 17 जानेवारी रोजी दुपारी शेख लष्कर परिसरात फिरत होता. त्यावेळी त्याच्यावर तीन आरोपींनी हल्ला केला. त्यांनी शेखवर वार करून त्याचा खून केला.
CCTV मुळं ही संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये केद झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यातील एकाचे नाव जगदीश दोडमनी (वय 28, रा. भवानी पेठ) असे आहे. फैजान रफिक शेख (वय २६, रा. चुडामण तालीमजवळ, भवानी पेठ), गुफरान मुज्जफर मोमीन (वय २१, रा. याकुबनगर चौक, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. फुटेजमध्ये दोडमनी आणि त्याचे दोन मित्र अरबाजवर हल्ला करताना दिसत आहेत. त्यांनी अरबाजचा चाकूने वार करून खून केला. या प्रकरणी पुणे शहर पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
हा अरबाज बबन शेख पुण्याच्या भवानी पेठेतला रहिवाशी होता. त्याचा त्यांच्या गल्लीत दबदबा होता. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताचा सुळसुळाट दिसून आला आहे.