नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील एका आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनी प्रसूत झाल्याची घटना चर्चेत असतानाच आधिवासी विकास विभाग्चाया आणखीन एका शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका एकलव्य निवासी शाळेतील सातव्या इयत्तेतमधील 15 ते 20 विद्यार्थिनींशी तेथील शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता शिक्षण क्षेत्रात काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल आदिवासी विभागाने घेतली आहे. या शिक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच अन्य 2 शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. तसेच नको त्या ठिकाणी हात लावत असल्याचे समोर आले आहे. सतत असे प्रकार त्यांच्याकडून सुरू होते. काही मुलींनी धाडस दाखवत पालकांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
पीडित मुलींनी नोंदवलेल्या जबाबानुसार संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचे समोर आले आहे. नंतर या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला. नंतर आदिवासी विकास उपायुक्त विनीता सोनावणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित शिक्षकांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली.
या प्रकरणामध्ये संबंधित शिक्षकाची विभागीय चौकशी केली जाणार आहे. यामध्ये 15 ते 20 मुलींचा विनयभंग करण्यात आला. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना आंदोलनाचा इशारा दिला आहे.