Crime News : इटलीमधून एक धक्कादायक माहिली समोर आली आहे. जेवण झाल्यानंतर मिठाई खाल्ल्यामुळे एक तरूणीचा मृत्यू झाला आहे. या विचित्र घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, इटलीतील मिलान येथे एका २० वर्षीय तरुणीचा दुग्धजन्य पदार्थांच्या ऍलर्जीमुळे मृत्यू झाला. अॅना बेलिसारियो असे या तरुणीचे नाव होते. अॅना बेलिसारियो ही मिलान येथील फॅशन डिझायनर आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत २६ जानेवारी २०२३ रोजी एका रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेली होती.
जेवणाची ऑर्डर केले. त्यामध्ये मिठाईतील दूध आणि अंडीमुळे तिला ऍलर्जीचा त्रास सुरू झाला आणि तिचा मृत्यू झाला. अॅनाला दुग्धजन्य पदार्थांची जीवघेणी ऍलर्जी होती. त्यामुळे ती फक्त विगन पदार्थ खात असे. ती ज्या रेस्टॉरंटमध्ये गेली होती तिथल्या मेनूमध्ये तिरामिशु नावाच्या मिठाईचा समावेश विगन म्हणून केला गेला होता.
अॅनाला वाटले की, ही मिठाई तिच्यासाठी चांगली आहे आणि तिने दोन घास खाल्ले. पण, त्या मिठाईमध्ये दूध आणि अंडी देखील वापरले जात होते. अॅनाला ऍलर्जीचा त्रास सुरू झाला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिचा मृत्यू झाला.
अॅनाच्या आईने या प्रकरणी रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल केला आहे. वकिलांचा आरोप आहे की, रेस्टॉरंटने ग्राहकांना चुकीची माहिती दिली. तिरामिशु नावाच्या मिठाईमध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असल्याची माहिती रेस्टॉरंटने मेनूमध्ये दिली नाही.
या घटनेमुळे इटलीमध्ये खळबळ उडाली आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.