…अन् पत्नीने थेट पतीचा प्रायव्हेट पार्टच कापला; अमरावतीतून धक्कादायक घटना आली समोर

पती पत्नींमध्ये भांडण ही सामान्य बाब आहे. पण आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यातील अमरावतीत एक भयानक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या पतीवर थेट हल्लाच केला आहे. पत्नीने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे समोर आले आहे.

तसेच असे करण्यामागचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. पती आपल्या माजी पत्नीचे रील्स व्हिडिओ पाहत होता. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडणे होत होती. पण तिचं न ऐकता तो पती गेल्या काही दिवसांपासून माजी पत्नीचे व्हिडिओ बघत असल्यामुळे संतापलेल्या पत्नीने असे कृत्य केले आहे.

संबंधित घटना ही नंदीगामामध्ये घडली आहे. इथे एक व्यक्ती पाच वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीपासून विभक्त झाला होता. त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. तो आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत मुप्पल्ला येथे राहत होता.

पाचच महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या माजी पत्नीच्या रिल्स व्हिडिओ पाहत होता. त्यामुळे त्याची पत्नी नाराज होती. त्यांच्यात भांडणंही झाली होती. पण तरीही पती काही ऐकत नव्हता.

एकदिवशी तो असाच रिल्स पाहत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पती त्याची बाजू मांडत होता. पण पत्नी काही ऐकायलाच तयार नव्हती. त्यामुळे भांडण थांबत नव्हते. अशात पत्नीचा संयम सुटला आणि तिने थेट ब्लेडने पतीचा प्रायव्हेट पार्टच कापला.

प्रायव्हेट पार्ट कापल्यामुळे पतीची प्रकृती खुपच बिघडली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्याला चांगल्या रुग्णालयात दाखल करा असे सांगितले. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पण अजूनही याप्रकरणी कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही.