Pune Crime: खळबळजनक! आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या महाराजाने ३ मुलींवर केला अनैसर्गिक अत्याचार

Pune Crime: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. देवाची आळंदीत वारकरी संप्रदायाला हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे . आळंदीतील एका महाराजांवर तीन अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक कृत्य करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणी आळंदी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसांपासून मुलांवर नैसर्गिक अत्याचार केला जात होता. आळंदीत वारकरी शिक्षण देणारी संस्था चालवणारा दासोपंत उंडाळकर हा संस्थाचालक कमी आणि शिक्षक म्हणून जास्त वापरायचा. पण दासोपंतने आपल्या विद्यार्थ्यांना वाचण्याचे शिकार बनवला आहे.

या संस्थेत जवळपास 70 मुले वारकरी शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दासोपंत तीन अल्पवयीन मुलींना एकांतात बोलवायचा. गेली पंधरा दिवसांपासून तो तीन अल्पवयीन मुलींना बोलवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा.

या सर्व धक्कादायक प्रकाराबद्दल पीडित मुलींनीच पहिल्यांदा खुलासा केला. स्वतःवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध हिम्मत दाखवून मुलींनी ही धक्कादायक घटना सर्वांसमोर उघडकीस आणली. पीडित मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकरला अटक केली आहे.

वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेत हा लाजिरवाणा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. सदर संस्थेत एकूण 70 मुलं आहेत. त्यांची ही चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संस्थेत यापूर्वी असा काही प्रकार घडला आहे का? इतर विद्यार्थ्यांना असा काही अनुभव आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करणार आहे.

इतर शिक्षक वर्ग आणि पालकांकडेही विचारपूस केली जाणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी दासोपंत उंडाळकर याचे वय 52 वर्ष आहे. पीडित तीनही मुली अल्पवयीन आहेत. आळंदी पोलिसांनी या प्रकरणी पोस्को कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी महाराजाला बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय हदरला आहे.