Pune Crime: प्रेमकथेचा भयानक शेवट! लॉजमध्ये इंजिनियर तरुणीवर प्रियकराने धडाधड झाडल्या गोळ्या अन..; कुटुंब हळहळलं

Pune Crime : पुण्यातील हिंजवडी येथे एका आयटी इंजिनीअर गर्लफ्रेंडची तिच्याच प्रियकराने हॉटेलमध्ये हत्या केल्याची घटना शनिवारी (२७ जानेवारी) रात्री घडली. या घटनेने हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.

खून झालेल्या तरुणीचे नाव वंदना के. द्विवेदी (वय २६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) आहे. तर, प्रियकराचे नाव ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) आहे. ऋषभ राजेश निगम याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ आणि वंदना हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत. ते एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. त्यातूनच मागील काही वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. वंदना २०२२मध्ये नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आली होती. तिथे ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती.

ऋषभ हा नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आला होता. तो २५ जानेवारी रोजी हिंजवडीतील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउन हाऊसमध्ये राहायला गेला. वंदना २६ जानेवारी रोजी हॉटेलमध्ये गेली. शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभने वंदनाशी वाद घातला. त्यातून रागाच्या भरात त्याने वंदनावर पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये वंदना जागीच ठार झाली.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी ऋषभला शोधण्यासाठी तपास सुरू केला. त्यानंतर ऋषभ मुंबईला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेतले.

पोलिसांनी ऋषभची चौकशी केली असता, त्याने वंदनावर गोळीबार केल्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, त्याला वंदनाच्या चारित्र्याबद्दल संशय होता. त्यातून त्यातून त्याने वाद घातला आणि गोळीबार केला. पोलिसांनी ऋषभला अटक केली आहे. या घटनेमुळे हिंजवडी आणि आयटी पार्क परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा प्रेमसंबंधाचे वाईट परिणाम दिसून आले आहेत.