Crime News: शेतातील रस्त्यावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद; समोर येताच पुन्हा जुंपली, अन् घडलं धक्कादायक कृत्य

Crime News : अकोले तालुक्यातील मान्हेरे येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही अनेकदा शेतातील रस्त्यावरून वाद झाल्याच ऐकल असले. पण एक घक्कदायक माहिती समोर आली आहे. शेतीच्या वादातून ७० वर्षीय शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव काशिनाथ सोमा बांबळे असे आहे. ते मान्हेरे गावातील रहिवासी होते. त्यांना विशाल हरी बांबळे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत काशिनाथ बांबळे जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विशाल बांबळे याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काशिनाथ बांबळे आणि आरोपी विशाल बांबळे यांच्यात शेतातील रस्त्यावरून वाद होता. २४ जानेवारी दुपारी १.३० वाजता त्यांची बाचाबाची झाली. नंतर मारहाणीत होऊन विशाल बांबळे याने काशिनाथ बांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यावेळी काशिनाथ बांबळे याला सोडवण्यासाठी त्यांच्या दोन्ही सुनांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी विशाल बांबळे याने त्यांनाही मारहाण केली. मारहाणीत काशिनाथ बांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत शेतकऱ्याचे कुटुंबियांना आधार देण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी विशाल बांबळे याला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एफ.जे. शेख, हवालदार सुनील पवार, दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, प्रकाश लांडगे करीत आहेत.