---Advertisement---

बापच ठरला वैरी! विषारी पावडर पाजत मुलाला संपवलं, भयंकर माहिती आली समोर….

---Advertisement---

सोलापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. येथील तुळजापूर हायवेवरील सर्व्हिस रोडलगतच्या नाल्याजवळ १३ जानेवारीला रात्री सापडलेल्या १४ वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे.

याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. शाळेत खोड्या करतो, अभ्यास करत नाही आणि वारंवार मोबाइल मागतो म्हणून बापानेच पोटच्या मुलाला ठार केले आहे. विजय सिद्राम बहूने असे त्यांचे नाव आहे.

त्यांनी मुलगा विशालला शीतपेयात विषारी पावडर घालून ठार मारल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या घटनेने सगळेच हादरले आहेत. याप्रकरणी निर्दयी बापाविरुद्ध रविवारी मध्यरात्री जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी मुलाची आई कीर्तीने (३३) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १३ जानेवारीला विजयने विशालला तुळजापूर रोड येथे निर्मनुष्य ठिकाणी दुचाकीवर नेले.

मुलाला शीतपेयात सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून त्याला दिली. नंतर सोलापूर-तुळजापूर हायवेवरील नाल्याजवळ विशाल बेशुद्धावस्थेत सापडला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तो दिसून आल्यानंतर जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले होते. यामुळे इतर कुटूंबियांना एकच धक्का बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---