Nashik Crime : मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…’ या गाण्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यादरम्यान सध्या हे गाणं एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. या गाण्यातील अभिनेत्या विरोध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसिद्ध अभिनेता विनोद उर्फ सचिन अशोक कुमावत यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विनोद त्याच्या गाण्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तो सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीची आणि विनोदची एका शुटिंग दरम्यान ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर काही दिवस मैत्री झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांची जवळीक वाढत गेली. याच ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाच आमीष दाखवून गेल्या पाच महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले आणि शारीरिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी२०२३ या काळात ते अनेक ठिकाणी फिरायला गेले होते. त्यांने पीडीत मुलीला वेग वेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. तिने यावेळी लग्नाची मागणी घातली. पण त्याने पीडित मुलीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पीडित मुलीने सांगितले आहे.
दरम्यान, विनोद हा विवाहित असून, त्याला एक मुलगाही असल्याची धक्कादायक माहिती तिला मिळाली. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत सातपूर येथील म्हाडा कॉलनीत वास्तव्यास आहे.
याप्रकरणी शनिवारी (दि.३ फेबुवारी) रात्री उशीरापर्यंत संशयित कुमावत यास पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नव्हती. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या महिला सहायक पोलिस निरिक्षक हांडोरे या करीत आहेत.
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं…’ या गाण्या सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यादरम्यान सध्या हे गाणं एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. या गाण्यातील अभिनेत्या विरोध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.