गेल्या महिन्याभरापासून अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. बुलढाण्यात समुद्धी महामार्गावर एक अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा बुलढाण्यात एक भीषण अपघात झाला आहे.
मलकापूर-बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले होते. त्यामुळे बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमध्ये ५५ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
हा अपघात इतका भयानक होता की बस थेट पलटी झाली. या अपघातामध्ये १५ ते २० लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताबाबत कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
स्थानिकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले आहे. यामध्ये १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ब्रेक फेल झाल्यामुळे हे अपघात झाल्याचे समोर आले आहे.
ही बस मलकापूरवरुन बुलढाण्याला जात होती. या बसमध्ये एकूण ५५ प्रवासी होते. राजूर घाटात या बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाला कळले. त्यामुळे बसवरचे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पलटी झाली.
दरम्यान, या अपघाताबाबत स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये जेवढे पण जण अडकलेले होते. त्यांना गावकऱ्यांनी सुखरुपपणे बाहेर काढले. त्यानंतर जे गंभीर जखमी होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.