सध्या मराठीतला कोणता चित्रपट चर्चेत असेल तर तो म्हणजे बाईपण भारी देवा. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला जमावला आहे. त्याने अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी यांनी चित्रपटात प्रमुख भुमिका निभावली आहे. तर या चित्रपटाला केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केले आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहे.
केदार शिंदे या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करत आहे. तसेच त्यांनी आता एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी त्यालाही भन्नाट उत्तर दिलं आहे.
मला पुढे राजकारणात जायचं आहे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करायचं नाही. पण आपण नेहमी कुंपनावर येऊन बोलतो. पण आता मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी पुढे राजकारणात येईल, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच मनोरंजनसृष्टीतील कामातून मी घरात आर्थिक स्थैर्य आणेल. त्यानंतर मी राजकारणात उतरणार आहे. मला सांस्कृतिकदृष्ट्या सकारात्मक कामं करण्यासाठी मला राजकारणात जायचं आहे. माझ्या वाईट काळात मला राज ठाकरेंनी मदत केली होती. त्यामुळे मला त्या माणसासोबत उभं राहायचं आहे, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच बाईपण भारी देवाच्या यशावरही केदार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमासृष्टीत अनेक चित्रपट हिट झाले त्यांच्या यशातही मी आनंद घेतला आहे. यश असो वा अपयश ते दोन्हीही दिवस जाणारच आहे. आज यश मिळालं आहे, म्हणून त्याच धुंदीत जगणारा मी नाही, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.