Abhishek Ghosalkar : मोठी बातमी! घोसाळकर गोळीबार प्रकरणात ‘रावण’ पोलिसांच्या ताब्यात, सगळंच सत्य समोर येणार..

Abhishek Ghosalkar : काल शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या.

तसेच नंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. यामुळे राज्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

याबाबत आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी हजर असलेल्या मेहूल पारेख याला पोलिसांनी कालच ताब्यात घेतले होते. आज रोहित शाहु उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांना त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. मॉरिस भाईने गोळीबारात जे शस्त्र वापरले आहे, ते अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. त्याचा देखील तपास पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही.

यामुळे ते पिस्तूल अवैध असल्याचे सांगितले जात आहे. मॉरिसकडे हे शस्त्र कुठून आलं, त्याला ते कसं मिळालं याचा आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पोलीस तसा तपास करत आहेत. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.