भयंकर! लव्ह सेक्स अन् धोका, एका व्यक्तीची तीन लग्न, अनैसर्गिक सेक्स…; घटनेने सगळेच हादरले

सध्या अनेक ठिकाणी अनैतिक संबंधातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. आता लखनऊमध्ये एका युवकाने तीन लग्न केल्याची घटना घडली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर या तरुणाने दुसरं लग्न केले. मात्र, त्यानंतरही तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. यामुळे पत्नीमध्ये वाद वाढू लागला.

पत्नीने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे, असे सांगून त्याने माझ्यासोबत लग्न केले. मात्र, आता तो तिसऱ्या पत्नीसोबत राहतो, अस दुसऱ्या पत्नीने सांगितले.

त्याने माझ्यासोबत नको त्या गोष्टी जबरदस्ती करून घेतल्या. लल्ला सिंह असं त्याचे नाव आहे. तो सतत तिला मारहाण करायचा तसंच, तिच्यावर अनैसर्गिक अत्याचारदेखील करायचा. त्याने दुसऱ्या पत्नीचा जबरदस्ती गर्भपातदेखील केला, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

दुसऱ्या पत्नीला त्याने घराबाहेर काढले. पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर तो तिसऱ्याच एका महिलेसोबत राहू लागला. पोलिस या प्रकरणी तपास करत असून पुढील कारवाई करणार आहेत. या प्रकरणी आरोपीच्या दुसऱ्या पत्नीने कोर्टातही दाद मागितली आहे. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलीस चौकशीत लल्ला सिंह याने तिसऱ्याच महिलेसोबत लग्न केले असून तो आता तिच्यासोबत राहत असल्याचे समोर आले आहे. त्याने तिसऱ्या पत्नीलाही दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून फसवले आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णालयाच्या संचालकाने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसरं लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीला मारहाण करुन घरातून बाहेर काढलं. नंतर दुसऱ्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून तिसरे लग्न केले, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता पोलीस तपास करत आहेत.