ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.
त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिश्राला पोलीस कोठडीत नेण्यात येत होतं तेव्हा तो म्हणाला, माझ्यासोबत चुकीचं झालंय, मला फसवलं जातंय, माझी काहीच चुकी नाही. त्यामुळे या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, असेही सांगितले जात आहे.
नंतर ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केले. मात्र या धक्कादायक घटनेने सगळेच हादरले असून सध्या गोळीबाराच्या अनेक घटना समोर येत आहेत.
दरम्यान, यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, असा त्याचा समज होता.