ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर शुक्रवारी गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस याबाबत तपास करत आहेत.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केला. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहेत. मॉरिस नोरोन्हा याने ज्या अंगरक्षाकाच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता.
या प्रकरणात सुरूवातीला मॉरिसने घोसाळकरांना मारलेल्या गोळ्या मारतानाचे फेसबुक लाईव्ह होते. अशाताच आता या प्रकरणात मॉरिस याच्या ऑफिसबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या हत्या प्रकरणात मॉरिस याचा मित्र मेहुल याला संशयित म्हणून पाहिलं जातं होतं.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्हीमध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये ऑफिसमध्ये होते. त्यादरम्यान मेहुल हा आतमध्ये येऊन गेला होती. गोळीबार होण्याआधी तो तिथून बाहेर पडला आणि रिक्षाजवळ गेला. तिथून परत एकदा पान टपरीजवळ गेला आणि त्यानंतर रिक्षात बसून निघून गेला.
मेहुलसोबत रिक्षामध्ये असलेले दोघे कोण आहेत? मेहुल याला गोळीबाराबाबत काही माहिती होती का? असा सवाल उपस्थित होत आहेत. मिश्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिश्रा त्याच्याकडे असलेले पिस्तुल मॉरिसच्या कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवायचा. त्याची डुप्लिकेट चावी मॉरिसने तयार करुन घेतली होती, पोलीस चौकशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी मॉरिसची पत्नी सरीनाचा जबाब काल नोंदवला. मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी त्यानं महत्त्वाच्या पक्षांकडून तिकिट मिळतंय का याची चाचपणी केली. पण बलात्काराचा आरोप असल्याने कोणताही पक्ष त्याला तिकिट देण्यास तयार नव्हता.
बलात्कारासह मॉरिसवर आणखी दोन केसेस होत्या. मॉरिसच्या मनात अभिषेक यांच्याबद्दल राग होता. त्याला सूड घ्यायचा होता, अशी माहिती तिनं पोलिसांना दिली. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे.