अजित पवारांनी झापताच आमदारांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी, वाचा नक्की काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा स्पष्ट बोलताना दिसत असतात. आताही असेच काहीसे झाल्यामुळे ते चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी आता त्यांच्याच गटातील आमदारांना झापलं आहे.

विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झापले आहे. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी एकनाथ शिंदेंची माफी मागितल्याचीही चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनरही लागले होते. मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि अमोल मिटकरी यांनीही वक्तव्य त्याबाबत केले होते.

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले होते. त्यामुळे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना बळ मिळत होते. अशात मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ट्विट केले होते. त्यामुळे सर्वत्र सभ्रम निर्माण होत होता.

अमोल मिटकरी, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अजित पवार खुपच नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच त्यांना झापले आहे. त्यानंतर आमदारांनी एकनाथ शिंदेंची माफी मागितल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपद अजित पवारांना मिळावं अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण आता आम्ही महायुतीत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उपस्थित होत नाही.