महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेलच्या विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते एक बैलगाडाप्रेमी म्हणून राज्यात ओळखले जात होते.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. बैलगाडा शर्यतीसाठी ते अनेक ठिकाणी हजेरी लावत असतं.
१९९६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती. याबर बंदी आल्यावर देखील त्यांनी याबाबत भूमिका घेतली होती.
आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. याचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
त्यांच्या एकदा बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैलमालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. त्यांच्या या निधनाने यामुळे खरा बैलगाडाप्रेमी आपल्यातून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.