मोठी बातमी! निलेश राणे यांना महापालिकेचा दणका, धक्कादायक माहिती आली समोर…

पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे निलेश राणे यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात त्यांच्या काही मालमत्ता आहेत.

याबाबत पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांची तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील डेक्कन भागात राणे यांची मालमत्ता आहे. डेक्कन या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक जागेचा कर निलेश राणे यांनी न भरल्यामुळे संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे. मुंबईत देखील काही दिवसांपूर्वी पालिकेने कारवाईचा इशारा दिला होता.

सध्या पुणे महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. निलेश राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजच कारवाई केली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये अनेक जणांनी मालमत्ता कर थकवला आहे.

त्यामुळे जर निर्धारित वेळेत करणे भरला नाही भरला, तर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराच आजच्या या कारवाईमुळे दिला गेला आहे. भाजप नेते निलेश राणेंच्या मालमत्तेची तब्बल तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची थकबाकी आहे.

सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यावर आता राणे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.