बाहेरची लोकं आपल्या धर्माचा अपमान करताय तरी…; फँड्रीची शालू का भडकली? पोस्ट चर्चेत..

सध्या देशातच नाही, तर जगभरात ओपेनहायमर चित्रपटाची चर्चा रंगली आहे. याचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन यांनी केल्यामुळे थिएटरमध्ये बघ्यांची गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे तिकीटे ही काही ठिकाणी २५०० रुपये सुद्धा आहे.

या सिनेमाला टक्कर देण्यासाठी बार्बी हा सिनेमाही रिलिज झाला होता. जगभरात बार्बी धुमाकूळ घालत असला तरी देशात ओपेनहायमरचीच चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.

अनेक कलाकार या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहे. आता फँड्रीतील शालू म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक फेसबूक पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

ओपेनहायमर या चित्रपटात भगवत गीतेचा संदर्भ दिला आहे. एकदा अणुबॉम्बचा सीन आहे, तर दुसऱ्या सीनमधे नायक आणि नायिका जेव्हा इंटिमेट होत असतात, तेव्हा तिच्या हातात भगवत गीता असते. त्यामुळे ओपेनहायमरमध्ये भगवत गीतेचा अपमान केला गेला आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्या सीनवरुनच राजेश्वरी खरातने संताप व्यक्त केला आहे.

फेसबूक पोस्ट-
हिन्दू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादि विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात, पण या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय.

आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे, यावर कोणी जास्तं काही बोलेनात. सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी.