ब्राम्हण समाजाबाबत वक्तव्य करून गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे यांची मोठी घोषणा! थेट राष्ट्रपतींना….

सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. आता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली. 3 मार्चपर्यंत हे आंदोलन स्थगित केले आहे. याबाबत आंदोलनाविरोधातली दडपशाही थांबवण्यासाठी, सगेसोयरे कायद्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांना ईमेल करा, असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं आहे. 

याबाबत मनोज जरांगे म्हणाले, मला अटक केली तर महाराष्ट्रात जागोजागी मराठे उपोषणाला बसतील, सरकारचा सगेसोयरे विषयावर चर्चाच करायची नाही, तोडगाच काढायचा नाही असा आरोपही जरांगेंनी केला आहे. सरकारने जरांगे समर्थकावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तीन मिनिटात अख्या ब्राह्मणांना संपवू अशी धमकी या तरुणाने दिली होती. काही दिवसांपासून याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी तक्रार केली होती.

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मराठा समाजात गरसमज नको, काय चौकशी व्हायचा होऊ द्या, 3 मार्च पर्यंत आपण आपले कार्यक्रम स्थगित केले आहे. त्याऐवजी गावागावात धरणे आंदोलन करा, असं जारंगे पाटील म्हणाले.

तसेच ब्राम्हण समाजाबाबत मी त्याला एकट्याला बोललो आहे ब्राम्हण समाजाला नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी धोका दिलाय म्हणून त्यांना बोललो, मात्र तुम्ही नेत्या कडून बोलताय, गोर गरिबांची तुम्ही फसवणूक करताय असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. 

आता मराठे राष्ट्रपती पंतप्रधान, राज्यपाल याना ई-मेल करणार, दडपशाही थाबवा, आणि सगे सोयरे कायदा करा असा ई-मेल करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.  येणाऱ्या काळात ते काय भूमिका घेणार हे देखील लवकरच समजेल.