अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केली.
याबाबत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंडाना अटक केली आहे. याबाबत तपास सुरू केला आहे. आरोपींमध्ये तीन आरोपी दिल्लीत राहणारे आहेत. मृत रमेश झा हे मूळचे दिल्लीचे आहेत.
ते एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते सर्वेदयनगर परिसरात आरोपी बायको सुमनदेवीसह दोन मुलांसह राहत होते. एका ढाब्या समोर भररस्त्यात कोणीतरी दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार मृतकचा मुलाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता दोन इसम पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसले. दोन्ही मारेकरी रिक्षात बसून दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जातांना दिसले. यामुळे तसा तपास सुरू झाला.
नंतर आरोपी दिल्लीला पळून गेलेत अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. यानंतर हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, मृतक रमेश झा यांचा २५ वर्षांपूर्वी आरोपी बायकोशी विवाह झाला, त्यांना दोन मुलं आहेत. त्यातच गेली १० वर्षापासून आरोपी बायको मुलांसह दिल्लीत राहत असताना तिचे धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंधातून अनैतिक संबध होते.
यामुळे मृतक नवरा अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याचं आरोपी बायकोने तिच्या प्रियकराला सांगितले. यातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली आहे.