सातारा, कोल्हापूर, सांगली आणि हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर अखेर शिक्कामोर्तब, जाणून घ्या…

सध्या राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेसाठी कोणाला किती जागा मिळणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये आता महाविकास आघाडीने काही ठिकाणी उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे उमेदवार असतील.

तसेच सांगलीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विशाल पाटील अथवा चंद्रहार पाटील यांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार आहे.

याठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील लढणार की त्यांचे सुपुत्र सारंग एवढाच मुद्दा आहे. यामुळे महाविकास आघाडीची पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटप झाल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. आता उमेदवार देखील कामाला लागले आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मागील वेळी शिवसेनेने विजय मिळवल्याने ठाकरे गटाने त्यावर हक्क सांगितला. मात्र या दोन्ही जागा त्यांना मिळणार नाहीत.
कारण हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार आहे. तसेच दुसरी कोल्हापूरची जागा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी सोडावी लागणार आहे.

यामुळे सांगलीची जागा सेनेला दिली जाणार आहे. दरम्यान, आज देखील महाविकास आघाडीची बैठक आहे. यामध्ये वंचित आघाडीशी चर्चा होणार आहे. त्यांना कोणती जागा मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.