टीम इंडियाला धक्का! पाचव्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती…

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे टीम इंडियाचा स्पिनर शाहबाज नदीमने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या याबाबत पोस्ट व्हायरल होत आहेत.

त्याने अचानक असा निर्णय का घेतला असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक विकेट घेणाऱ्या शाहबाज नदीमने निवृत्तीची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. याबाबत त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तो म्हणाला, तरुणांना क्रिकेटमध्ये संधी मिळावी आणि त्यांनी क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवावं, म्हणून आपण निवृत्ती घेत आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नदीमने टीम इंडियामध्ये पदार्पण केले होते.

नदीमने टीम इंडियासाठी 2 कसोटी सामने खेळले आहेत. त्या सामन्यात त्याने 4 विकेट्स नावावर केल्या. मात्र, या सिरीजनंतर शाहबाज नदीमच्या कारकीर्दीला ब्रेक लागला. आता मी तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा विचार केलाय. मला माहितीये की, मला इथून पुढे टीम इंडियामध्ये संधी मिळणार नाही, असेही तो म्हणाला.

मी तरुणांना संधी मिळावी म्हणून पाय मागे घेतोय. आज मी निवृत्ती जाहीर करतोय. जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे. कोणताही निर्णय खूप भावनिक होऊन घेऊ नये, असं मला वाटतं, असेही त्याने म्हटले आहे.

मी झारखंड संघासोबत 20 वर्षांपासून खेळतोय. आजही झारखंडला कोणीही हलक्यात घेत नाही. आम्ही नक्कीच येत्या काळात ट्रॉफी जिंकू, असा विश्वास देखील त्याने यावेळी व्यक्त केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे सध्या चर्चा सुरू झाली आहे.